नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी; उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी निश्चित

0
58

अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आल्यानंतर आता निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसते. त्यामुळे बंडखोरीचे संकटही भेडसावण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 2018 मधील निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणालाही न मिळाल्यामुळे यंदा सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिकेतील 17 प्रभागांमध्ये एकूण 68 नगरसेवक निवडले जाणार असून, बहुमतासाठी 35 नगरसेवकांचा आकडा गाठावा लागणार आहे.

यंदा नव्या समीकरणांमुळे राजकीय पक्षांची गणितं बदलणार आहेत. मागील पाच वर्षांत पक्षांतर, गटबाजी आणि अंतर्गत मतभेद वाढले असून, त्याचा थेट परिणाम उमेदवारीवर होणार आहे. अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरीकडे वळू शकतात.

राज्यात सत्तेत असलेल्या तीनही पक्षात मोठी रस्सीखेच असणार आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी मोठ्याप्रमाणात पक्षबदल आणि शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून येते. अशात मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाले आहेत. यामुळे ही निवडणूक केवळ मतांच्या आधारे नव्हे, तर राजकीय डावपेच आणि अंतर्गत गटबाजीवरही अवलंबून असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here