मा.ना. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये शिवसेना महायुतीचा सामाजिक उपक्रमांचा महासंगम!

0
98

संगमनेर, ९ फेब्रुवारी – मा.ना. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात शिवसेना महायुतीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या सेवेचा वारसा पुढे न्यावा आणि पक्षाचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला.

या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, जिथे मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असा उद्देश होता.

शिवसेनेचे खरे बळ म्हणजे पक्षासाठी अखंड निष्ठा आणि सेवाभाव जपणारे ज्येष्ठ शिवसैनिक. त्यांच्या अथक योगदानाचा सन्मान म्हणून ‘शिवसन्मान’ देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सेवेसमर्पणाची दखल घेतली आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.

शिवसेना पक्ष संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले, ज्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडण्यात आले. या अभियानामुळे नव्या पिढीतील तरुण कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेबद्दल नवचैतन्य निर्माण झाले.

या कार्यक्रमात शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संगमनेरच्या मातीतील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा हेच सर्वोच्च कर्तव्य असल्याचा संदेश पुन्हा एकदा दृढ केला.

या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचा संकल्प कायम ठेवू.असे मत यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here