आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून प्रवरा नदी पूल ते बस स्थानक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

0
82

संगमनेर १० फेब्रुवारी :
संगमनेर शहरातील प्रवरा नदी पूल ते बस स्थानकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि ठोस निर्णयामुळे हे महत्त्वाचे काम मार्गी लागले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा

संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष निधीतून मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात हॉटेल स्टेटस ते बस स्थानकापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द हा भाग पूर्ण झाला. मात्र, बस स्थानक ते प्रवरा नदी पूल या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने काम रखडले होते.

वाहनचालक आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले. संयुक्त पथकाने धडक कारवाई करत बस स्थानक ते प्रवरा नदी पूल आणि तीन बत्ती चौक ते पंचायत समिती दरम्यान अतिक्रमण हटवले.

माणुसकीच्या भावनेतून ठेकेदाराला दिली मुदत

रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू होणार होते, मात्र संबंधित ठेकेदार आजारी असल्याने काहीसा विलंब झाला. ठेकेदाराने थोडी मुदत मागितली असता आमदार अमोल खताळ यांनी माणुसकीच्या भावनेतून त्याला काही दिवस दिले. आजारातून ठेकेदार बरा झाल्यानंतर अखेर आजपासून कामाला सुरुवात झाली आहे.

रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार

हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागात असून, वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली होती. रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या ठोस निर्णयाचे कौतुक

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी साहसी निर्णय घेतला असून,यामुळे विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण संगमनेरमध्ये त्यांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here