संगमनेर : कुरण येथील एका खासगी क्लिनिकमध्ये तपासणीस गेलेल्या 34 वर्षीय महिलेसोबत फॅमिली डॉक्टरनेच मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली.
तपासणीच्या नावाखाली अश्लीलतेचा विकृत प्रकार
पीडित महिलेला टॉन्सिलची तक्रार असल्याने ती आपल्या मुलासह कुरण येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. मुलगा बाहेर थांबला असताना, महिला आत जाऊन डॉक्टरांशी संवाद साधत होती. डॉक्टरने तपासणीसाठी महिलेला बेडवर झोपण्यास सांगितले. ती विश्वासाने बेडवर झोपली असता, डॉक्टरने गळ्याजवळ तपासणी सुरू केल्याचा बहाणा करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेला डॉक्टरच्या स्पर्शात विकृती जाणवली. शिवाय त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या वासामुळे तिच्या लक्षात आले की तो मद्यधुंद अवस्थेत आहे.
डॉक्टरने टॉन्सिल काढावे लागेल, असे सांगितले. मात्र, त्याच वेळी त्याचे हात वारंवार नको त्या ठिकाणी जात असल्याने महिलेचा संशय बळावला. त्याने महिलेकडे एकटक पाहत असभ्य वागणूक सुरू ठेवली. हे लक्षात आल्यानंतर पीडित महिलने तत्काळ क्लिनिकच्या बाहेर धाव घेतली.
केला. महिला घाबरून बाहेर पळताच तिच्या मुलाने डॉक्टरकडे जाब विचारला. मात्र, डॉक्टर काहीही उत्तर न देता गप्प राहिला. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरच्या क्लिनिकवर जाऊन निषेध व्यक्त केला आणि त्याच्या क्लिनिकचे नुकसान करून संताप व्यक्त
शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
पीडित महिला घरी गेल्यानंतर तिने पतीस हा प्रकार सांगितला. या घटनेनंतर पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. राहुल इंगळे याच्याविरुद्ध संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील डॉक्टरांप्रती विश्वास डळमळीत करणारी या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.








