कासारा दुमाला ग्रामस्थांच्या शेतजमिनीवरील चुकीच्या नोंदीबाबत आमदार अमोल खताळ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

0
236

कासारा दुमाला येथील ग्रामस्थांच्या शेतजमिनींवर चुकीची नावे, पोकळीस्थ नावे व अनधिकृतरीत्या चढवलेली नोंदी असल्याच्या गंभीर तक्रारींवर आज ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आमदार अमोलजी खताळ साहेबांची भेट घेतली.

ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय सरकारदरबारी घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून लवकरात लवकर या नोंदी दुरुस्त करण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर इतरांची पोकळीस्त नावे चढवली गेली असून, काही ठिकाणी मालक नसलेल्या व्यक्तींची नावे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे जमिनीचे व्यवहार, पीक कर्ज प्रक्रिया, सरकारी अनुदाने व इतर महत्त्वाच्या शेतकरी योजनांमध्ये अडथळे येत आहेत. या गंभीर बनलेल्या समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, या मागणीसाठी कसारा दुमाला येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत निवेदन दिले.

दरम्यान, विधानसभा पावसाळी अधिवेशन काळापासूनच याप्रकरणी आमदार अमोल खताळ यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वीच संगमनेरमधील इंदिरानगर, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर, राजापूर व अन्य भागांतील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आ. खताळ यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.या बैठकीदरम्यान चर्चा व्हावी यासाठी ग्रामस्थांनी अजून काही महत्त्वाच्या बाबी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या मुद्द्यांचा समावेश असलेले निवेदनही आज सुपूर्द केले.

या चर्चेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणात बैठक बोलावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामुळे या प्रकरणातील कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा आहे.

“शेतकऱ्यांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ही बाब माझ्या व्यक्तिगत लक्षात असून, ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे. या जमिनीच्या व्यवहारामध्ये जे भू माफिया आहेत ते कोणाचे बगलबच्चे आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि मी स्वतःही सर्वसामान्य आहे,” असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या अपेक्षा आता प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होत आहे.

यावेळी आमदार अमोल खताळ यांना निवेदन देण्यासाठी गंगाधर मुरलीधर सातपुते, संजय रामभाऊ सातपुते, बादशहा कारभारी सातपुते, उत्तम कारभारी सातपुते, तुळशीराम कारभारी सातपुते, गोरक्षनाथ मरत्नीधर सातपुते, सुदाम मुरलीधर सातपुते, विजय रामभाऊ सातपुते, दत्तू लक्ष्मण बुळकुंडे, बाबूलाल लक्ष्मण बुळकुंडे, बबन रामचंद्र बुळकुंडे, छबन रामचंद्र बुळकुंडे, निवृत्ती रामचंद्र बुळकुंडे, दिलीप सोमनाथ ढोले, गंगाधर दामोधर ढोले हरिभाऊ दामोधर ढोले, सूर्यभान दामोधर ढोले, प्रशांत हरिभाऊ ढोले, अनिल नारायण ढोले, सोमनाथ गोपीनाथ ढोले, गुलाब सोमनाथ ढोले, रतनबाई नारायण ढोले, अनिल नारायण ढोले, सुनील नारायण ढोले, राजेश वाळीबा ढोले, रवी रमेश बुळकुंडे, किरण रामेश बुळकुंडे, मांडा रमेश बुळकुंडे, कलावती काशिनाथ जाधव, यमुना लक्ष्मण म्हस्के, ताराबाई सोमनाथ म्हस्के, ल्हान्बाई सुभाष थोरात, गोकुळ रामचंद्र बुळकुंडे, रागुनाथ मुरलीधर सातपुते, ताराबाई सोमनाथ ढोले, दत्तात्रय बाबुराव ढोले, नलिनी दत्तात्रय ढोले, संदीप दत्तात्रय ढोले इत्यादी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here