काँग्रेसच्या बिनबुडाच्या आरोपांना भीक घालणार नाही” – संदेश देशमुख

0
91

संगमनेर : राजापूर ग्रामपंचायतीवर अनेक वर्षां पासून काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही गावातील अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. मात्र, आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश देशमुख यांनी या प्रश्नांकडे लक्ष वेधत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच विरोधक त्यांच्यावर निराधार आरोप करत आहेत. “या बिनबुडाच्या आरोपांना मी कधीच भीक घालणार नाही,” असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या माध्यमातून गावात बेकायदेशीर आणि बनावट कामे सुरू असल्याचा आरोप करत देशमुख म्हणाले, “या चुकीच्या कामांविरोधात मी आवाज उठवत आहे, म्हणूनच मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण मी  त्यांच्या कोणत्याही दबावाला न जुमानता गावातील चुकीच्या कामांना येथून मागेही विरोध करत आलो आणि येथून पुढे विरोध करतच राहणार आहे. असेही देशमुख यांनी ठणकावून सांगितले

आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून गावातील “शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी आवश्यक असलेली विजेची डीपी एक रुपयाही न घेता शेतकऱ्यांना तातडीने  मिळवून देण्यात आली असल्याचे सांगत ते म्हणाले की, गावची ग्रामसभा  ही गावातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी घेतल्या जातात, मात्र राजापूरमधील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ग्रामसभेचे नेमके उद्दिष्ट समजलेलेच नाही, अशी टीकाही देशमुख यांनी केली. “ग्रामसभा ही गावा च्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असते की ग्रामपंचायतीची मालमत्ता लाटण्यासाठी? असते हेच सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना समजत नाही,” अशी टीका देशमुख यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here