मेन रोड व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेत साधला संवाद
संगमनेर : दिवाळी सणानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ व मेन रोड परिसरातील सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांना आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिपावली निमित्त शुभेच्छा देत त्यांच्याअडीअडचणी जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान आमदार खताळ यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापाऱ्यांच्या अडचणीं समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केली
दीपावली सणानिमित्त शहरातील सर्वच दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहे कापड,फर्निचर, फटाके, मिठाई,आगल दिवे सजावटीच्या वस्तू,, किराणा स्टोअर्स मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली संपूर्ण बाजार पेठ उजळून निघाली असून सर्वत्र आनंद मय वातावरण निर्माण झाले आहे. या पावनपर्वावर आपला जिव्हाळा आणि आपुलकीच्या माणसांशी संवाद साधता यावा यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शहरातील मेन रोड आणि बाजार पेठेतील प्रत्येक दुकानात अचानक आमदार अमोल खताळ आली हे पाहून व्यापारी सुद्धा आश्चर्यचकित झाले.
स्वतः आमदार खताळ यांनी प्रत्येक दुकानदारा च्या दुकानात प्रत्यक्ष जाऊन दुकानदारां च्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच नागरिकांशी सुद्धा संवाद साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार अमोल खताळ यांचा व्यापारी वर्गाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा – आमदार अमोल खताळ
सध्याच्या ऑनलाईनच्या युगात आपण स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार न करता खरेदी करतो. मात्र, स्पर्धेच्या या काळामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी आहे. किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, फटाके किंवा इतर कोणतीही खरेदी करत असताना संगमनेर शहर आणि तालुक्यातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा.” असे आवाहन त्यांनी केले आहे.
संगमनेरची बाजारपेठ या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी, मेहनती व्यापारी आणि प्रवरा माईच्या कृपाशिर्वादानेच समृद्ध झाली आहे. या तालुक्यातील अनेक युवक पुणे, मुंबई, नाशिक, या ठिकाणी नोकरी व व्यवसाय करत आहेत. त्यांच्यामुळेच संगमनेरमध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे. त्यांच्यामुळे दिवाळी सणानिमित्त संगमनेरची बाजारपेठ फुलली असल्याचे आमदार खताळ यांनी यावेली ठणकावून सांगितले.








