आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

0
40

“संगमनेरच्या विकासाचा दीप अधिक तेजोमय करूया” – आमदार अमोल खताळ

संगमनेर : दीपावलीच्या निमित्ताने संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात आमदार अमोल खताळ म्हणाले, “आपल्याला तसेच आपल्या कुटुंबियांना आनंद, आरोग्य, शांतता आणि समृद्धीने भरलेल्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा हा सण आपल्या आयुष्यात नव्या आशा, नवचैतन्य आणि सकारात्मक बदलांचा उत्साह घेऊन येवो, अशी मनापासून इच्छा आहे.”

यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले “आपल्या सहकार्यामुळे संगमनेर तालुका सर्वांगीण प्रगती आणि परिवर्तनाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आपला विश्वास आणि साथ हीच माझ्या कामाची प्रेरणा आहे. आपण सर्वांनी मिळून संगमनेरच्या विकासाचा दीप उजळत ठेवूया.”

“आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात, पण दीपावली हा असा सण आहे ज्यामध्ये थोरा-मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. ही दिवाळी केवळ प्रकाशाची नव्हे, तर आपले परिश्रम, एकता आणि आनंदाचा सण आहे.”

“आपला बळीराजा जो वर्षभर पाऊस, दुष्काळ, संकटं आणि आव्हानं सहन करत शेती करतो, तोच आपल्या समाजाचा खरा दीप आहे. त्याच्या श्रमामुळेच आपल्या घराघरात समृद्धीचा प्रकाश येतो. आज नैसर्गिक संकटं आणि अनिश्चित पावसाच्या काळातही बळीराजा खचत नाही; उलट नव्या उत्साहाने आणि नव्या आशेने दिवाळी साजरी करतो.

आम्ही महायुती सरकार म्हणून बळीराजाच्या सोबत आहोत. त्यांच्या श्रमांमुळेच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळते आणि प्रत्येक घरात आनंदाचा प्रकाश पसरतो.
माझ्या येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये विकासाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख संगमनेरला मिळवून देण्याचा प्रयत्न राहील,”असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

या निमित्ताने आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागरिकांना आनंदमय, मंगलमय आणि सुरक्षित दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here