संगमनेर : नवी मुंबईतील उलवे भागात राहणाऱ्या सुरेंद्र आसाराम पाडे या चालकाची हत्या केल्यानंतर त्याची कार घेऊन पळून गेलेल्या १९ वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर संगमनेर पोलिसांच्या हाती लागले आहे.
याबाबत संगमनेर पोलिसांकडुन मिळाल्यानंतर उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरात जाऊन पाहणी केल्यानंतर त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर उलवे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील तरुणी रिया दिनेश सरकल्याणसिग (१९) आणि तिचा प्रियकर विशाल संजय शिंदे (२१) या दोघांना अटक केली. मयत शरीर सुखाची मागणी करत असल्याने हत्या केल्याचे दोघांनी सांगितले. मृत सुरेंद्र पांडे हा मुळचा उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असून सध्या तो उलवे सेक्टर-२४ मधील मोहागाव येथील क्रियांश रेसीडेन्सी इमारतीत एकटाच राहत होता. तसेच तो ओला कार चालवत होता.
महिन्याभरापुर्वी सुरेंद्र पांडे याची आरोपी तरुणी रिया सरकल्याणसिंग हिच्यासोबत ओळख झाली. रिया ही नोकरीच्या शोधात असल्याने सुरेंद्र पाडे याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे
आश्वासन देऊन तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला होता. तेव्हांपासून रिया सुरेंद्र पांडे याच्या घरामध्ये राहत होती.
चार दिवसापुर्वी रियाने संगमनेर येथे राहणाऱ्या विशाल शिंदे या प्रियकराला उलवे येथील घरी बोलावून घेतले होते. तो सुद्धा रियासोबत सदर घरात राहु लागल्यानंतर २ एप्रिल रोजी सुरेंद्र पांडे याचे रिया, बिशाल यांच्यासोबत भांडण झाले. या भांडणात रिया आणि विशाल या दोषांनी सुरेंद्र पाडे याच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करून त्याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह चादरीत बांधुन ठेवून दिल्यानंतर त्याच्या घराला बाहेरुन टाळे लावून त्याची बॅगनार कार घेऊन पळ काढला होता. यादरम्यान, त्यांच्या बॅगनार कारचा पुण्याजवळ अपघात झाला, या अपघातातून बचावल्यानंतर ते थेट संगमनेर येथे विशालच्या घरी पोहोचुन त्यांनी घरच्यांना घङच्या प्रकाराची माहिती दिली.
विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलिसांत हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वतः संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच त्यांनी सुरेंद्र पाडे याची हत्या केल्याची कबुली देऊन त्याचा मृतदेह त्याच्या घरामध्ये चादरीत बांधून ठेवल्याचे सांगितले..








