ट्रकचा झोला बसून दुचाकी अपघात संगमनेरमध्ये महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर

0
109

संगमनेर : शहराजवळील -गुंजाळवाडी शिवारात बुधवरी (दि.१९) दुपारी चार वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे नाशिक बाह्यवळण मार्गावर गुंजाळवाडी शिवारात रस्त्याचे काम चालू आहे. यामुळे वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आलेली आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी चार बाजेच्या सुमारास मालवाहू टुक (क्र. एम एच. १२. एन एक्स. ३४८०) या रस्त्याने जात असताना झोला बसल्याने पलटी झाला. त्याचवेळी पुढे जात असलेली दुचाकी (क्र. (क्र. एम एच. १७, के, ४२४९) यात सापडल्याने तिच्यावरील महिला सरीता गोपीनाथ फटांगरे (वय ४५, रा. बाळेश्वर, ता. संगमनेर) ही जागीच ठार झाली. तर गोपीनाथ फटांगरे (वय ५०) आणि रबी गोपीनाथ फटांगरे(वय २४) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करत बाहतूक सुरळीत केली, या अपघाताचा उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here