अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तात्काळ सुरू करा ; आ. अमोल खताळ

0
535

संगमनेर – संगमनेर तालुक्यात गेली चार ते पाच दिवसांपासून मान्सून पूर्व वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.पण या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे तसेच घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे .त्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावेत असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संगमनेर तालुक्यात शेतकरी खरीप पूर्व शेतीची मशागत करण्यात गुंतलेला असताना अचानक चार ते पाच दिवसापासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे.या मान्सून पूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा भाजीपाला ,फळपिके ,चारापिके यासह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वादळ वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत .तर काहींची घरे पडली आहे.यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे हा मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी फलदायी न ठरता नुकसानकारकच ठरला आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची शेत पिकांचे तसेच घरांचे तसेच गोठ्यांचे त्वरित पंचनामे सुरू करावेत अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here