आश्वी बुद्रुक येथे अपघातात १ जण ठार तर १ जण जख्मी

0
122

संगमनेर (आश्वी) : आश्वी बुद्रुक (ता संगमनेर) इरीगेशन रोड वरील गणपती मंदीरा समोर मोटर सायकलच्या समोरा समोर अपघातातामध्ये नतिन हिवाळे वय ४२ वर्षे हा जागीच ठार झाला असुन जख्मी विट भट्टी कामगार विशाल बर्डे ह्याला पुढील उपचारासाठी लोणी (ता राहाता) येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

सविस्त माहीती अशी की, गाडी नंबर एम एच १७ डि बी ७२६५ गाडी चालक नतिन हिवाळे वय ४२ वर्षे राहणार आश्वी बुद्रुक (ता संगमनेर) हा लोणीवरून काम आटपुन आपल्या घरी येत होता तर गाडी नंबर एम एच १६ सी डब्ल्यु ७८५१ विट भट्टी काम गार विशाल बर्डे (वय १९) राहणार प्रतापपुर (ता संगमनेर) हा आश्वी बुद्रुक हुन प्रतापपुर (ता संगमनेर) येथे जात होता इरीगेशन रोड वर गणपती मंदीरा समोर दोन्ही गाड्याची मोठी धडक झाली, घटनास्थळी नुकसान बघता गाडी स्वार हे अति भयान वेगाने गाडी चालवत असल्याचे दिसते.


गणपती मंदिरा समोर ४० वर्षापुर्वी मोठा अपघात झाला होता. त्या अपघाता मयताच्या डोक्याला जबर मार लागतला होता मयत हा उस वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर मधून उस काढताना खालीपडुन त्याच्या डोक्यावरून उस वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरचे चाक गेल्याने तो जागीच मृत्यु झाला होता या घटनेचा उजाळा आज या अपघातामुळे झाला. आश्वी बुद्रुक (ता संगमनेर) येथील लोणी हसनापुर रस्ता हावरदळीचा असुन येथे अनेकदा अपघात होत असतात येथे कामय स्वरूपी पोलीस उभे राहणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ अनिस शेख यांनी मागणी केली. याघटनेत मृत नितीन हिवाळे हे पेपर वाटणारा सचिन अमोलिक यांचे दाजी होते. डॉक्टरांना आपण देव मानतो पण आश्वी खुर्द (ता संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका आणण्यासाठी गेलो असता तेथील वैद्यकिय अधिकारी डॉ विनायक काकड यांनी प्रथमता ऑम्बुलस देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, येथील रुग्णवाहिका ह्या गरोधर महीलांची वाहतुक करण्यासाठी असुन देण्यासाठी टाळाटाळ करत होते नंतर कोणाचा तरी फोन आल्यावर त्यांनी ऑम्बुलस दिली असल्याचे गणेश खेमनर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here