संगमनेर : प्रतिनिधी सर्व सामान्यासह गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये लवकरच ‘आमदार आपल्या गावात’ हे अभियान सुरु करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे केली.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळा खोली भूमीपूजन आ खताळ यांच्या हस्ते केले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बोलत होते कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक हरि कोरडकर हे होते यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा मालुंजे माजी संरपच संदिप घुगे, डिग्रसचे संरपच अशोक खेमनर, उप संरपच रंगन्नाथ बिडगर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादा गुंजाळ शिवसेना लुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी खांबा गावचे सरपंच रवी दातीर ॲड.संदिप जगनर, मच्छीद्र तांबडे, शहाजी बिडगर, वामन बर्डे, अनिल खेमनर, मोठ्याभाऊ खेमनर, मच्छीद्र कोरडकर, साहेबराव नान्नर, गणपत बिडगर, खंडू बिडगर, मुरलीधर बर्डे, ग्रामसेविका श्रीमती रुपाली कहाणे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. खताळ पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्यात महायुतीचा आमदार नसताना सुद्धा लकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी तालुक्याला सहाशे कोटी दिले होते तर आता संगमनेर विधानसभेचा आमदारच महायुतीचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वांपेक्षा तुम्हाला जास्त निधी दिला जाईल, असे सांगितले आहे त्यामुळे या तालुक्याच्या विकासा साठी हजारो कोटी रुपयांचा निधी मिळेल यात शंका नाही या निधीतून या मतदार संघात मुलभूत सुविधा निर्माण करु’ तसेच हा तालुका अनेक वर्षापासून पाण्यापासून काहींनी वंचित ठेवला आहे मात्र आपण चाकूर पठारबागाने तळेगाव निमोण या भागातील जनतेचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवून हा तालुका टँकर मुक्त करण्यासाठी आपला प्राधान्य क्रम राहील असेही आ खताळ यांनी या वेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरपच अशोकराव खेमनर यांनी केले.








