ठाणे येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विविध पदके पटकावणाऱ्या पोलिस खेळाडू. समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आदी.
राज्य क्रीडा स्पर्धाः पोलिस अधीक्षकांकडून सत्कार
अहिल्यानगर : ठाणे येथे पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगरच्या पोलिस दलातील पोलिस खेळाडूंनी तीन सुवर्णपदके, एक रौप्य आणि चार कांस्यपदके पटकावले.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी विजयी पोलिस खेळाडूंचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस निरीक्षक उमेश परदेशी, पोलिस उपनिरीक्षक विक्टर जोसेफ आदी उपस्थित होते. या स्पर्धेत अहिल्यानगरच्या २८ पोलिस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील आठ पोलिस खेळाडू यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कामगिरी केली.
बास्केटबॉल स्पर्धेत कपिल श्रीराम गायकवाड व धीरज अभंग यांनी कोल्हापूर परिक्षेत्रावर मात करत अंतिम सामन्यात सुवर्णपदक पटकाविले. उशू खेळ प्रकारात मनीषा निमोणकर यांनी सुवर्णपदक जिंकले. बॉक्सिंगमध्ये कोमल शिंदे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तायक्वांदोमध्ये रौप्यपदक मिळविले. जुडो स्पर्धेत शेखर वाघ यांनी कांस्यपदक पटकावले. बॉक्सिंगमध्ये आशा वाघ यांनी कांस्यपदक पटकाविले. कुस्ती स्पर्धेत ज्योती झुघे यांनी कांस्यपदक पटकाविले. तायक्वांदो स्पर्धेत काजल वीर यांनी कांस्यपदक पटकाविले.








