आंध्र प्रदेशमधील साई भक्ताकडून शिर्डीत सोन्याचा मुकुट दान; किंमत ऐकून थक्क व्हाल, पाहा खास PHOTOS

0
85
दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश येथील एका साईभक्ताने ६८ लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट दान दिला असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

शिर्डी : साईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान साईभक्तांकडून जमा होत आहे. साईबाबांच्या चरणी देश विदेशातील कोट्यावधी भाविक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. यामध्ये सोने, चांदी, हिरे तसेच रोख रक्कम यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो.

मागील काही वर्षांपासून भाविकांकडून दानात येणाऱ्या साईबाबांच्या सुवर्ण मुकुटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने साईचरणी 788.44 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत ६८ लाख रुपये असून आत साईबाबा संस्थानकडे सुवर्ण मुकुटांची संख्या 28 वर पोहचली आहे. हा सुवर्ण मुकूट 2025 मधील सर्वाधिक मौल्यवान दान म्हणून ओळखला जात आहे. या मुकूटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं असून त्यामध्ये डायमंडने कोरलेलं ‘ॐ’ हे चिन्ह विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मुकूटाचे दान करणाऱ्या भक्ताने आपलं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली आहे.

साईसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भाविकाचा सत्कार करत आभार मानले आहे.
















LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here