संगमनेर- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामागावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या वाहनचालकांच्या डोके दुखीचे कारण ठरत आहे. काम सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाण झझपाट्याने वाढले असून, बाहतूक सतत ठप्प होत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. पुणे नाशिक महामागनि प्रवास नकोच!’ अशी भावना आता सर्वसामान्यांमध्ये बळावू लागली आहे.
काम सुरू असतानाही पुरेसे वाहतूक नियोजन न केल्याने एकाच लेनवरून मोठ्या प्रमाणावर बाहनांची दोन्ही बाजूंनी बाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पोलीस ससेमिरा टाळण्यासाठी बरेच चालक अपघातानंतर आपसातच तडजोड करून निघून जात असल्याचे डोळासणे पोलिस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ठोस वाहतूक नियोजन केले गेले असते तर ही परिस्थिती टाळता आली असती. मात्र संबंधित कंपनीने याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. जुन्या चंदनापुरी घाटातून बाहतूक वळवली असली तरी तिथेही योग्य दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आंबी खालसा फाटा ते घारगाव यादरम्यान दररोज महामार्गावर बाहतूक ठप्प होत आहे. महामार्ग सिमेंट कॉक्रिटीकरणाचे काम सुरू असून, मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक नाशिक लेनने बळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर प्रशासनासह वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही.
वाहनचालकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ !
सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे दररोज ७ ते ८ अपघात घडत आहेत. वाहनांचे मोठे नुकसान तर होत आहेच, शिवाय प्रवाशांनाही अपार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गाने प्रवास करणे वाहन चालकांसाठी जिवावर उदार होण्यासारखे ठरत आहे. प्रश्न असा आहे की, अजून किती काळ संबंधित कंपनी वाहन चालकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत राहणार?
प्रशासनाचा हलगर्जीपणा, कोणालाही काही देणेघेणे नाही !
महामार्गावर रोज अपघात होत असले तरी त्याकडे ना प्रशासन लक्ष देते, ना राजकीय नेते आवाज उठवतात. सर्व काही आलबेल असल्याचा दिखावा केला जात आहे. वाहनचालक आणि प्रवासी मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.








