विद्यानगर परिसरात अस्वच्छतेचा विळखा – कडक कारवाईची मागणी

0
77

संगमनेर : संगमनेर शहराच्या स्वच्छ ते साठी नगरपालिका मुख्याधिकारी कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या प्रयत्नांना विद्यानगर परिसरात अपवाद ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

विद्यानगर भागात मोठ्या प्रमाणात केडमीचे विद्यार्थी, विविध मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी, रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि इतर नोकरदार वर्ग वास्तव्यास आहेत. हे अनेक नागरिक बाहेरून येताना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जेवणाचे पदार्थ तसेच मद्याच्या बाटल्या घेऊन येतात. नंतर या वस्तूचा उरलेला कचरा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांबर किंवा इतरांच्या घरांच्या गेटसमोर बेधडक फेकून देतात.

या असंवेदनशील वर्तनामुळे परिसरात अस्वच्छतेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. परिणामी, नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून, त्यांना रोजच या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. या परिस्थितीकडे गांभीयनि पाहणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील या प्रकारावर कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून, संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विद्यानगर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here