साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी १ कोटींपेक्षा जास्त किंमतीचा सुवर्णहार अर्पण

0
30

शिर्डी : श्री साईबाबांच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिवशी भक्तीचे अनोखे उदाहरण शिर्डीत पाहायला मिळाले. आंध्रप्रदेशातील एका साईभक्ताने तब्बल ९४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला असून, या हाराची बाजारभावानुसार किंमत तब्बल ₹१ कोटी २ लाख ७४ हजार ५८० रुपये इतकी आहे.

साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान अत्यंत भक्तिभावाने पार पडला. या काळात लाखो भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले. उत्सवाच्या सांगतेवेळी आंध्रप्रदेशातील या साईभक्ताने अपार श्रद्धेने हा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला. ही देणगी देणार्‍या भक्ताने स्वतःचे नाव गुप्त ठेवले आहे.

देणगीदाराने स्वतःचे नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली असून, हा मौल्यवान हार शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीला अर्पण करण्यात आला.

हा सुवर्णहार केवळ वजनदारच नाही तर त्यावर केलेले अत्यंत आकर्षक नक्षीकाम आणि नवरत्नांची सजावट यामुळे तो देखणा व दिमाखदार दिसतो. भाविकाने साईबाबांप्रती असलेल्या श्रद्धा आणि निष्ठेच्या भावनेतून केलेले हे अर्पण, पुन्हा एकदा शिर्डीतील भक्तीची परंपरा अधोरेखित करणारे ठरले आहे. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी अर्पण झालेला हा कोटींचा सुवर्णहार श्रद्धा, भक्ती आणि अटळ विश्वासाचे जिवंत प्रतीक ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here