विमानतळावर होणार नवीन धावपट्टी

0
92

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली आहे. नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक विमतनतळाच्या विकासासाठी गती मिळणार असून नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी १६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आंतरराष्ट्रीय पडताळणी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here