संगमनेरात दिवसा ढवळ्या घरफोडीचा धक्कादायक प्रकार; चोरट्यांनी लंपास केले सोन्याचे दागिने

0
34

संगमनेर : तालुक्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांचा धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करण्यास सुरुवात केली असून, पठार भागातील बोरबन गावात झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी कैलास गडगे आणि त्यांची पत्नी घारगाव येथे कामानिमित्त गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. घरात प्रवेश करून डबे व वस्तूंची उचकापाचक करण्यात आली. चोरट्यांनी बॅगेत ठेवलेले २ तोळे सोन्याचे दागिने, १२ सोन्याचे मनी, व एक नथ असा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी कैलास काशिनाथ गडगे (रा. बोरबन, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने गस्त व तपास यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here