पिंपरणे ग्रामपंचायतीची आरोग्यपूरक मोहीम; तणनाशक फवारणीमुळे गावात स्वच्छतेचा संदेश

0
45

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील नागरिक व सरपंच यांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम हाती घेत तो पुर्ण केला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे यामुळे गावातील रिकाम्या जागेत ठिकठिकाणी गवतासह विविध प्रकारचे तण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गावाचा परिसर अस्ताव्यस्त झाला होता. याची दखल घेत पिंपरणे ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात तणनाशक फवारणी करत स्वच्छता मोहीम राबवली.

पावसाळ्यात विविध आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. पाणी आणि ओलाव्यामुळे गवत वाढून त्यामध्ये मच्छर, विषारी कीटक तयार होतात, यामुळे डेंगू, मलेरिया तसेच आरोग्याचे इतर गंभीर प्रश्न निर्माण होतात. याची जाणीव ठेवून ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ यांनी तात्काळ पुढाकार घेत तणनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बुधवारी सकाळी सरपंच मरभळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात तणनाशक फवारणी सुरू करण्यात आली. फवारणीच्या या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य उत्तम राहींज, निलेश बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला तर फवारणीचे काम रितेश साळवे व भैय्या साळवे यांनी केले फवारणी कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई प्रदीप मांडे हे स्वतः उपस्थित राहिले

गावातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, अमरधाम तसेच जिल्हा परिषद शाळेजवळ व अंगणवाड्यांभोवती फवारणी करण्यात आली फवारणीनंतर गावात स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्म बदल झाल्याचे चित्र दिसून आले.

या प्रभावी आणि वेळेवर झालेल्या कारवाईबद्दल सरपंच नारायण मरभळ आणि ग्रामपंचायत सदस्य आणि मित्रपरिवाराचे गावक-यांनी आभार मानले आहेत. पिंपरणे ग्रामपंचायतीने यानंतरही नियमित फवारणी व स्वच्छतेचे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा गावातील नागरिकांनी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here