कोल्हारच्या समता पतसंस्थेमध्ये ‘सेल्फ बँकिंग’ आणि घरबसल्या ऑनलाईन मुदत ठेव सेवेचा शुभारंभ

0
35

संगमनेर : अलीकडच्या काळात बॅंकिंग क्षेत्रात ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशात ग्राहकांना सेवा व सुविधा देण्यासाठी कोल्हार बुद्रुक येथील समता पतसंस्थेकडूनही सेल्फ बँकिंग तसेच घरबसल्या ऑनलाईन मुदत ठेव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना अशाप्रकारची आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणारी संपूर्ण महाराष्ट्रातील ही बहुदा पहिलीच एकमेव संस्था असावी. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी दिली आहे.

तालुक्यातील कोल्हार येथे आज झुंबरशेठ कुंकूलोळ कॉम्प्लेक्स मध्ये समता पतसंस्था कोल्हार शाखेच्या चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कोल्हार शाखेमध्ये सेल्फ बँकिंग व ऑनलाईन मुदत ठेव योजनेचा शुभारंभ ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सेल्फ बँकिंग, घरबसल्या ऑनलाईन मुदत ठेव सुविधा, मिस कॉल पेमेंट सुविधा, मिस कॉल बॅलन्स इन्क्वायरी सुविधांची सुरुवात करण्यात आली आहे.

या प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी समता पतसंस्थेने वर्क फ्रॉम होम या संकल्पने प्रमाणे बँकिंग फ्रॉम होम ही बैंकिंग क्षेत्रातील नवीन अभिनव संकल्पना ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हार बुद्रुक येथे समता पतसंस्था गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेची स्थापना कोपरगाव येथे ३९ वर्षांपूर्वी झाली. संस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा एव्हाना पार केलेला आहे. कोल्हारच्या शाखेमध्ये ८ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. यासोबत समता पतसंस्था ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक सोनेतारण कर्ज रक्कम देणारी संस्था आहे. एक तोळे सोन्याच्या दागिन्यावर अंदाजे ८२ हजार रक्कम कर्जदाराला येथे मिळू शकते. शिवाय हे गोल्ड लोन करण्याची सर्वात सोपी, सुलभ व जलद प्रक्रिया येथे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here