संगमनेरला आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, भव्य योग शिबिराला आमदार अमोल खताळ उपस्थित

0
57

संगमनेर : आज (शनिवार) आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. देशातही वेगवेगळ्या ठिकाणी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पतंजली योग समिती, संगमनेर यांच्या वतीने मातोश्री लॉन्स, संगमनेर येथे भव्य योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

योगऋषी स्वामी रामदेव संचलित पतंजलि योग समिती व परिवार संगमनेर यांच्याकडून 17 मे ते 21 मे असे पाच दिवस योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेपाच ते सात या वेळेत योगाभ्यास करण्यात आला. या शिबिरात आमदार अमोल खताळ सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नागरिक व योग साधकांच्या समवेत योग व प्राणायाम केले.

तसेच, आमदार खताळ यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्व सांगत सर्वांना दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. या भारतीय प्राचीन परंपरेचा व संस्कृतीचा सर्व देशांमध्ये प्रचार व प्रसार होत आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र योगाभ्यास करताना दिसून येतात. एकत्र येत एकात्मतेचा संदेश देत शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर समतोल साधता येतो हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here