संगमनेरात एटीएम कार्डची अदलाबदल करून 35 हजारांची फसवणूक

0
50

संगमनेर : शहरातील जाणता राजा मैदानाजवळील युनियन बँकेच्या एटीएममध्ये फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला. बुधवारी अज्ञात व्यक्तीने अत्यंत शिताफीने कार्डची अदलाबदल करून वृद्धाची 35,100 रूपयांची फसवणूक केली आहे.

रहिमपूर येथील शेतकरी शिवाजी साबळे एटीएममधून पैसे काढत होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा एटीएम पिन नंबर पहिला. या अज्ञात भामट्याने तुमचे एटीएम कार्ड ओले आहे, मी पुसून देतो असं सांगुन मोठ्या चलाखीने कार्ड बदलून टाकले.

वृद्ध शेतकरी शिवाजी साबळे एटीएममधून बाहेर पडल्यानंतर आरोपीने एटीएम कार्डच्या माध्यमातून बँक खात्यातील 35 हजार 100 रुपये रक्कम काढली. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

एटीएम केंद्रावर काय काळजी घ्याल?
बटणांच्या शेजारी कोणते वेगळे मशीन बसवले नाही ना, हे तपासावे. एटीएम मशीन हाताळता येत नसेल तर जेथे सुरक्षारक्षक असतात, तेथे जाऊन त्यांची मदत घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here