हाती टाळ अन् कपाळी चंदनाचा टिळा, आमदार अमोल खताळ निवृत्तीनाथांच्या पालखीत रमले

0
124

संगमनेर : आषाढी वारीच्या निमित्ताने टाळ, मृदंग आणि विठुरायाचा जयघोष करत श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पादुका पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. आज (सोमवार) संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे श्री निवृत्तीनाथांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी तालुक्याचे आमदार अमोल खताळ विठूनामाच्या भक्तिरसात तल्लीन झाले.

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत ५६ दिंड्यांसह हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. २६ दिवसांच्या प्रवासानंतर ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुक येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ सपत्नीक उपस्थित होते. परंपरा आणि संस्कृती जपत त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. तसेच पायी दिंडीत सहभागी होऊन विठुरायाचा जयघोष केला. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अशी होणार पालखी मार्गस्थ

नाशिक-पंचवटी-मुक्तिधाम(नाशिक रोड) पळसे-लोणारवाडी खंबाळे-पारेगाव-गोगलगाव-राजुरी-बेलापूर-राहुरी-डोंगरगण-अहमदनगर-साकत – घोगरगाव- मिरज गाव-चिंचोली कर्जत- कोरेगाव- राबगाव-जेऊर -कंदर -दगडी अकोले-करकंब -पांढरीवाडी-चिंचोली-पंढरपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here