संगमनेर मध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ एकत्र आले होते. यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी ‘मुझको पहेचानलो मैं हूँ डॉन’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. सुजय विखे यांचे हे टायमिंग अन् डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्यावरून संगमनेरमध्ये चर्चा रंगली आहे.भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर ठेका धरला.
संगमनेर शहरातील बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने संगमनेर शहरात महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुजय विखे व थोरात यांचा पराभव करणारे आमदार अमोल खताळ सपत्नीक या कार्यक्रमाला हजर होते.सुजय विखे आणि अमोल खताळ यांनी आपल्या पत्नीसह रॅम्प वॉक केला.यानंतर बच्चे कंपनी समवेत सुजय विखे यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला.तर मै हु डॉन या गाण्यावर सुजय विखेंनी ठेका धरल्याने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं कार्यक्रमात उपस्थित होत्या.








