संगमनेर : तालुक्यातील नावाजलेल्या पिंपरणे येथील छत्रपती सहकारी दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सभेत संस्थेला सर्वात जास्त दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांचा किटली देऊन सत्कार करण्यात आला.
सभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, व्यापारी ताळेबंद, नफा-तोटा पत्रक सादर करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यावर माफक चर्चा झाली. तसेच संस्थेच्या परिसरात सौर ऊर्जेचे पॅनत बसवण्यास मान्यता देण्यात आली. याप्रसंगी जास्तीत जास्त दूध घालणाऱ्या सभासदांचा सत्कार करून त्यांना किटल्या प्रदान करण्यात आल्या. त्यात प्रथम क्रमांक किशोर जोर्वेकर, द्वितीय क्रमांक किरण देशमुख, तृतीय क्रमांक मच्छिद्र काळे, चतुर्थ क्रमांक शिवाजी दिघे तर पाचवा क्रमांक रमेश वाकचौरे यांनी पटकावला.
संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना आणखी दूध उत्पादन वाढवण्याचे तसेच नवीन सभासदांना संस्थेशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भविष्यात आणखी प्रगती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
संस्थेचे चेअरमन दिनकर वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली असून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये व्हा. चेअरमन रावसाहेब ठोंबरे, संचालक शिवराम वाकचौरे, शिवाजी राहिज कुंडलिक ठोंबरे, किशोर जोर्वेकर, राहुल निकम, प्रदीप रक्टे, मच्छिंद्र काळे, किरण देशमुख, सौ. ज्योती अभंग, सौ. छाया वर्पे, सचिव प्रल्हाद ठोंबरे, संकलक लहानु ठोंबरे आदी मान्यवर तसेच संस्थेचे मोठ्या संख्येने सभासद व दूध उत्पादक उपस्थित होते.








