थोरातांनी संगमनेरच्या युवकांची बदनामी थांबवावी – सुशील शेवाळे

0
1288

अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कारवाई झालीच पाहिजे.

संगमनेर : संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या काळातील अवैध धंद्यांचा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली असून, विधानसभेतील पराभवाचे नैराश्य त्यांच्या वक्तव्यात अजूनही दीसत आहे.महायुती आणि आमदार अमोल खताळ यांच्यावर टिका करून ‘खोट बोल पण रेटून बोल’ आशा त्यांच्या प्रवृतीला तालुक्यातील जनता थारा देणार नाही. बेताल वक्तव्य करून युवा पिढीला बदनाम करण्याचे कट कारस्थान थोरातांनी त्वरित थांबवावे. आगामी निवडणुकीत हीच युवाशक्ती आपणास पुन्हा धडा शिकवणार असल्याचा सूचक इशारा संगमनेर युवासेना प्रमुख सुशील शेवाळे यांनी दिला आहे.

पिंपरणे येथील सभेत माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी अवैध धंदे, अमली पदार्थ आणि गुन्हेगारी संदर्भात केलेले सर्व आरोप आणि घटनाक्रम त्यांच्याच काळातील असून अनुभवातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. युवा पिढी नासवण्याचे काम त्या काळात झाले असून आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकाळात त्यावर थेट कारवाईच झाली आहे. त्याच कारवाईचा आधार घेत थोरात निवडणूकीचा मुद्दा बनवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सुशील शेवाळे यांनी केला आहे.

दरम्यान 40 वर्ष जो चुकीचा प्रकार चालला तो बंद करण्यासाठी तात्काळ कठोर भूमिका आमदार खताळ यांनी घेतली. प्रशासनाला वेळोवेळी कारवाईचे आदेश दिले, महत्वाचे म्हणजे कायदा मोडणारा कोणी का असेना तिथे कोणताही विचार न करता कारवाईच केली. “त्याबद्दल विरोधकांनी माझी बदनामी केली तरी चालेल पण मी तालुक्यातील युवकांना वाईट मार्गाला जाऊ देणार नाही” असा ठाम निर्णय घेऊन आमदार खताळ यांनी पाऊले उचलली असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात आणि पिंपरणे येथील सभेत वाळू संदर्भात बोलताना थोरात यांनी वाळूमुळे युवा भरकटत असल्याचा प्रकार सांगितला तो खरा असून यापूर्वी गावोगावी यांनी तयार केलेल्या वाळू माफियांच्या पिढ्या यामध्ये बरबाद झाल्याचे संगमनेरकरांनी पाहिले आहे. त्यांच्या काळातील वाळू माफियांची गुंडगिरीही जनतेनं अनुभवली आहे, या सर्वांना पाठीशी घातल्यानेचं विधानसभा निवडणुकीत जनतेनं तुमचा पराभव केला या वास्तवाची जणीव युवासेना प्रमुख सुशील शेवाळे यांनी पत्रकातून करून दिली आहे.

संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी बदलल्यापासून गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली जात आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा गट-तट न पाहता आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार आणि विधानसभेतील मागणीनुसार अनेक वर्षांपासून फोफावलेल्या ड्रग्स, गांजा, गुटखा, दारू, अमली पदार्थ तस्कर यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

तालुक्यातील अनेक तरूण स्वकष्टाने विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवत आहेत. यामुळे तालुक्याचे नाव मोठे होते, परंतु आपल्या क्षणभरच्या वक्तव्याने सर्वच युवकांकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारत्मक होत आहे. राज्यात तालुक्याची बदनामी करण्यात तुम्हाला कोणता आनंद वाटतोॽ असा सवाल शेवाळे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here