उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. विखे आणि ना. सामंत यांच्या सहकार्याने पाठपुराव्याला यश!
तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या यशस्वी प्रयत्नांना महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे यश मिळाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीची सुरूवात झाली असून कौठे मलकापूर येथे औद्यगिक वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने शासनाने अहवाल मागविला असल्याची माहीती आ.अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता.विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्यगिक वसाहत निर्माण करण्याची घोषणा केली होती.उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही याबाबत संगमनेरात दिलेल्या शब्दाची पूर्तता होण्यास प्रारंभ झाला असून युवकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे समाधान आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केले.
यापुर्वी तालुक्यात औद्यगिक वसाहत व्हावी म्हणून २४मार्च २०२५ रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र देवून तालुक्यातील कौठे मलकापूर येथील जागेचे पर्याय सुचवले होते.त्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनात केलेल्या मागणीलाही उद्योग विभागाने सकारत्मकता दर्शवून याबबातचे पत्र दिले.त्यानंतर ९जुलै २०२५ रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत औद्यगिक वसाहतीच्या निर्णयाबाबतचा आढावा घेण्यात आल्याची माहीती आ.खताळांनी दिली.
अहील्यानगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाने २६सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तालुक्यातील कौठे मलकापूर येथील जागेच्या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला.त्यानूसार संगमनेर प्रांत तहसिल कार्यालयाने कौठे मलकापूर येथील जागेची पाहाणी करून जागेचा अहवाल ३डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांना सादर केला असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.यासर्व प्रक्रीयेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असून, उद्योग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीबद्द्ल आ.अमोल खताळ यांनी समाधान व्यक्त करून सर्वाच्या सहकार्याने औद्यगिक वसाहतीचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर औद्यगिक वसाहत निर्माण करण्याचा शब्द मी दिला होता.चाळीस वर्षे ज्यांच्या हातात सर्व सतास्थान असतानाही जे युवकांना रोजगार उपलब्ध करून देवू शकले नाहीत ते आता आयत्या बिळावर नागोबा होवून महायुती सरकारच्या प्रयत्नाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.मात्र माझे प्रामाणिक प्रयत्न संगमनेरच्या जनतेने पाहीले आहेत.त्यामुळे कोणीही किती डांगोरा पिटला तरी सूज्ञ जनता वेळ येईल तेव्हा खोटे श्रेय घेणार्यांना उतर देईल असा टोला आ.खताळ यांनी लगावला.








