नवीन वर्ष सुखी समाधानी आणि आरोग्य संपन्न जावो- आ. खताळ

0
47

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला येणारे नवीन वर्ष हे सुखी-समाधानी, आनंदी आणि आरोग्य संपन्न जावो, अशा सदिच्छा आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या जनतेला दिल्या.

आमदार खताळ म्हणाले की, या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे. नवीन वर्षामध्ये संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अधिक जोमाने काम केले जाईल. तसेच विकासासाठी मी सदैव जनते सोबत राहील. नवीन वर्षात प्रत्येक समाजघटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आमदार खताळ यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here