संगमनेरातील रस्त्यांना स्व. कासट, स्व. परदेशी व स्व. केसेकर यांची नावे द्यावीत

0
171

महायुतीने मुख्याधिकाऱ्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी

संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील प्रमुख रस्त्यांना स्वर्गीय राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास उर्फ “आप्पा” केसेकर यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेना महायुती पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदन सिंग परदेशी व स्व. कैलास केसेकर यांचा संगमनेर शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आजही शहरातील लोकांच्या मना मध्ये जिवंत आहे. वरील तीनही नेत्यांनी आपल्या आयुष्यात समाज हितासाठी विविध उपक्रम राबवून शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देत गेले. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुविधा स्थापन करून शहराच्या प्रगतीस हातभार लावला आहे.

स्व. कासट, स्व. परदेशी आणि स्व. केसेकर यांच्या स्मृती कायम चिरंतन राहाव्यात आणि नव्या पिढीसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा, यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देणे आवश्यक आहे, असा आग्रह निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर संबंधित पदाधिकाऱ्यांची सह्या देखील आहेत. आता या मागणी वर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी शिवसेना महायुतीच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी तसेच दिपाली वाव्हळ, उपशहर प्रमुख अजित जाधव, युवासेनेचे उपजिल्हा प्रमख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, युवती शहरप्रमुख शिवज्ञा अरगडे, पुनम दायमा, मंगल खेडकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सिताराम मोहरीकर, प्रवीण कर्पे, भारत गवळी, वरद बागुल, अभिराज सांगळे, सनी धारणकर, अनिकेत चांगले, लाला दायमा, शशांक नामन, अक्षय वर्पे, ऋषिकेश मुळे, विनायक तांबे, सोहम नेवासकर, सागर भोईर, सिद्धेश शेलार, विशाल इंगंदुल, विनायक ओढतुल्ले, सिद्धार्थ तुरकणे,यांच्यासह महायुती कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here