कविता स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सहभाग प्रेरणादायी – साहेबराव शेळके

0
92

संगमनेर : साहित्य हे आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते, साहित्यातून आपल्याला तेजस्वी इतिहास माहिती होतो. साहित्य हे जीवनाला नवसंजीवनी देत असते. प्रेरणादायी कविता आपल्याला जगण्याचे बळ देतात, अशा या आगळ्यावेगळ्या स्वरचित कविता स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर पालक व शिक्षकांनी घेतलेला सह‌भाग ही एक प्रेरणादायी बाब आहे असे विचार क्रांतिवीर वसंतराव नाईक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष साहेबराव शेळके यांनी व्यक्त केले.

पुढे श्री शेळके म्हणाले, यासाठी आपण कथा कविता आदि साहित्याची साधना केली पाहिजे यासाठी अवांतर वाचनाची गोडी लागली पाहिजे. प्राचार्य एस. एम. गडाख यांचे मार्गदर्शनाखाली
कार्यक्रम घेण्यात आला.

लहान गट, मोठा गट व शिक्षक गटातून प्रथम क्रमांक अनुक्रमे, श्रुती निलेश भुसे, ओकार विठ्ठल गाडेकर, प्राचार्य एस. एम. गडाख व पालक गटातून बनिता छबू घुगे यांनी पटकावला, विजेत्यांना पुस्तक व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सुदाम गोडे, बाळकृष्ण चोपडे, साहेबराव गवळी, क्रीडाशिक्षक अशोक कांडेकर, बाळनाथ घुगे, राजेंद्र गोडगे, सुप्रिया जोंधळे, कुंडलिक मेढे, संजय जोंधळे, बाळासाहेब मुर्तडक, सुधीर गडाख, समता आल्हाट, सुप्रिया जौथळे, वृषाली गुळवे, सुनीता तोडमल, दुर्गा मुजबळ, ज्ञानदेव कांबळे, मल्हारी शिंदे, सुनील पवार, रामदास भोसले, याकुब तांबोळी, अनु इनामदार, नवनाथ कोहकडे, संतु पर्वत, शरद शिंदे, भगवान सांगळे, पांडुरंग मंडलिक, स्वप्निल गुंजाळ, एकनाथ घुगे, राजेंद्र बाघ, गणपत मंडलिक, मच्छिंद्र मंडलिक, आदि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मौलिक प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक बी.आर. पिंगळे व बाचन प्रकल्प प्रमुख दिघे पी. बी. यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here