शिवरायांच्या इतिहासाचे रेल्वे टूरने दर्शन ; मुख्यमंत्र्यांकडून सर्किट ट्रेनची घोषणा

0
62

मुंबई: शिवरायांचा इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या १० दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. तर यावर्षीदेखील जवळपास २३७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहे.


गोंदियाबल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे निश्चितपणे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार, व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक लाईन मंजूर झाल्याने मी मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जवळपास १ लाख ७३ हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशन रेल्वे विभागाकडून रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल देखील आहे. जवळपास राज्यातील सर्वच स्टेशनचे वर्डक्लासम ध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण जर बघितले तर युपीएच्या १० वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला १० हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाही. यावर्षीदेखील जवळपास २३७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळाले आहे. आता दरवर्षी २३ हजार २५ हजार कोटी रुपये हे आपल्याला मोदीजींच्या सरकारमध्ये अपग्रेडेशनसाठी मिळत आहे. यात नवीन रेल्वे लाईन देखील सुरू होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळ आहेत, याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे. ही पण मला असे वाटते की अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी रेल्वे मंत्र्यांचे मी आभार मानतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here