संगमनेर मर्चट्स बँकेची शहीद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदत

0
67

एक रामदासाच्या बलिदानातून भारतमातेसाठी हजारो रामदास बडे तयार होतील राजेश मालपाणी

संगमनेर : जम्मू आणि -काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना भारतमातेसाठी प्राण अर्पण करणारे मेंढवण गावचे रहिवासी शहीद रामदास बडे यांच्या कुटुंबाला संगमनेर मर्चेंट्स बँकेकडून ५०,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक यांच्या उपस्थितीत आयोजित शोकसभेत शहीद रामदास बडे यांच्या पत्नी आणि मुलीच्या हस्ते ही मदत सुपूर्त करण्यात आली.

स्व. ओंकारनाथजी मालपाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या संगमनेर मर्चेंट्स बँकेचा समाजसेवा आणि सामाजिक जबाबदारीचा गौरवशाली इतिहास आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांना साथ देण्याच्या हेतूने बँकेने घेतलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.

यापूर्वीही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा येथील दोन जवानांच्या कुटुंबीयांना अशाच प्रकारे आर्थिक मदत बँकेने केली होती. ही परंपरा बँकेच्या सामाजिक दातृत्वाचा आदर्श दाखवते. या वेळी बँकेचे चेअरमन श्री. राजेंद्र वाकचौरे म्हणाले, शहीद बडे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारतमातेसाठी त्यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाच्या स्मरणात राहील. यावेळी श्री. प्रकाश राठी यांनी श्रद्धांजलीपर पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष मुकेश कोठारी, संचालक श्रीगोपाल पडतानी, प्रकाश कलंत्री, मधुसूदन नावंदर, सम्राट भंडारी, महेश डंग, वैभव दिवेकर, श्याम भडांगे, सीए प्रवीण दिड्डी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here