प्राण्यांना पाणवठ्यांव्दारे पाणी ; सहायक वन संरक्षक संदिप पाटील यांचा पुढाकार

0
76

संगमनेर (आश्वी): संगमनेर तालुक्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. जंगलातील प्राण्यांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी संगमनेर सहायक वनसंरक्षक संदिप पाटील सरसावले दिसतात. पशु, पक्षांना पिण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने पाणवठ्यांव्दारे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे जंगलातील पाण्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक पाण्याचे झरे डबके, पाणवठे, साधारणता एप्रिल व मे मध्ये आटल्यानंतर पक्षु पक्षी, प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते ही समस्या कायमची सोडविण्यासाठी संगमनेर सहायक वन संरक्षक संदिप पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच्या बरोबर संगमनेर परिक्षेत्र वन अधिकारी भाग १ चे सचिन लोढे, भाग २ चे सागर केदारे व भाग ३ चे सुभाष सांगळे यांनी त्याच्या टिम योग्य सुचना देत जंगलातील प्राणी, पक्षांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचा साठी उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

वनविभागामार्फत संगमनेर वनतळे, तालुक्यातील वनबंधारे, पाणवठ्यांमध्ये मे अखेर पर्यंत काही प्रमाणात पाणी असते पाण्याअभावी मृत्यू होणाऱ्या पशु पक्षांचा जीव वाचविण्यासाठी जंगलातील ज्या जागामध्ये पाण्याचे नौसर्धिक स्त्रोत उपलब्ध नाही अशा ठिकाणी पानवठे निर्माण करून टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्याचा पाण्यांचा प्रश्न सुटण्याची शक्याता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here