आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली ६५ सरपंच, नगरसेवकांचा शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

0
130

ठाणे – ठाणे येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आ.अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६५ सरपंच, अनेक नगरसेवक, नगरपंचायत सदस्य, उपसभापती आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, आणि संगमनेरचे ‘जायंट किलर’ आमदार अमोल खताळ पाटील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आज मी माझ्या लाडक्या भाऊ-बहिणींना भेटलो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही दाखवलेला विश्वास मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो, ऊर्जा देतो.”

मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे सांगितले, “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे मालक-नोकर संस्कृती नाही. जो काम करेल तोच पुढे जाईल.”
ते म्हणाले, “महायुती सरकारने जलयुक्त शिवार सारख्या अनेक योजना सुरू केल्या होत्या त्या महाविकास आघाडीने बंद केल्या त्या पुन्हा सुरू होतील , निळवंडे धरणाचे पाणी सुरू झाले आहे आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.”

आ.अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मारुती मेंगाळ, जगनशेठ देशमुख, सुशांत गजे, बाळासाहेब भोर, सचिन शेटे, रामदास आंबरे, जावेद जागीरदार, रोहिदास जाधव, पोपट मेंगाळ, भरत मेंगाळ, गणेश पापळ, सुधीर मदे, आनंदा गिरे, सुभाष येवले, नाथा भोर, बी. के. आवारी, गोविंद जोळेकर, सुरेश धुमाळ, किसन आंबरे, बाळासाहेब मदे, सोमा मेंगाळ, प्रकाश पाचपुते, अजय भांगरे, संदीप भोर यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी सांगितले, मारुती मेंगाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे आमदार अमोल खताळ यांच्या मदतीने त्या भागातील प्रश्न सोडवण्यास मोठी मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here