संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर छापा – १२०० किलो गोमांस जप्त

0
75

संगमनेर – अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अनधिकृत चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून १२०० किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य असा मिळून ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध प्रतिबंधित गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील शिवाजी रोड येथील डॉ. सुभाष पाटील यांच्या क्लिनिकच्या मागे शेंडगाव शिवारात इसमांच्या मदतीने गोवंश जातीचे जनावरे कत्तल कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे नि. दिनेश आहेर यांना समजली. त्यांनी लगेच पोलिस पथकाला पकडण्यासाठी पाठवले आणि लगेचच छापेमारी केली.

त्यामध्ये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. गणेश लोंढे, अक्षय गिर्हे, नवनाथ गिरे, अरविंद माणगाव आणि शहर पोलिस पथक सहभागी होते.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रशांत कामठे, पो. उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी पोलिस पथकाला मदतीसाठी पाठवले आणि जनता आवाजने दिलेल्या बातमीची पुष्टी केली.

कत्तलखान्यावर छापा करत असताना निर्देशांस आले. पोलिस पथकाला पाहताच काही इसम तेथून पळून गेले. त्याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शहर पोलिसांत अनिल कुशीरे, अनिल सांडगे, गणेश कुशीरे (रा. भारतनगर), मुनाफ मेहबूब कुशीरे, अनिस शेख (रा. भारतनगर, संगमनेर) यांच्यावर दोन इसम अज्ञात फरार झालेले आहेत. त्यांच्यावर गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. यातील सलमान रशीद शेख (रा. जम जम कॉलनी) यास पोलिसांनी अटक केली आहे.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने १२०० किलो गोमांस, ६० हजार रुपये किंमतीचे तीन गोवंश जनावरे (जिवंत), ९ हजार रुपये किंमतीचा वजन काटा, ७०० रुपयांचे लोखंडी सत्तूर असा मिळून ८ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगमनेर शहरातील बकरी मंडई, डांबरी रोड, गांधी मैदान आदी भागात मोठ्या प्रमाणात कत्तलीची जनावरे विक्रीसाठी आणली जातात.

अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे या प्रकाराला आळा बसावा, म्हणून प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here