लसूण खात्रीशीर नफा देणारा असला तरी 4-5 महिन्यांचे पीक असणाऱ्या लसून शेतीचं कसे नियोजन करता येईल, ते या शेतकऱ्यानंही सांगितलंय.
भाजीतला लसूण हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरामध्ये वापरला जातो. सध्या लसणाचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याकडे असलेला लसुन त्यांना चांगले पैसे मिळवून देत आहे.त्यामुळे शेतकऱ्याकडे असलेला लसुन त्यांना चांगले पैसे मिळवून देत आहे. त्यांच्याकडे असलेल्या 9 एकर शेती पैकी एक ते दीड एकर वर ते दरवर्षी लसुन लावतात या लसूण पिकापासून त्यांना दरवर्षी लाखोंचा नफा मिळतो चार महिन्याचं असलेलं लसूण पीक खात्रीशीर नफा देणार आहे.चार महिन्यातच चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळत असल्याने जरे केवळ लसूण शेतीवरच भर देतात.विष्णू जरे यांनी मागील 25 वर्षात पारंपारिक लसूण ते विद्यापीठाने विकसित केलेले वेगवेगळे लसूण पिकं घेतली आहेत लसूण पिकात त्यांचा मोठा अनुभव आहे.आपल्याकडे असलेल्या शेतीतील काही भागात लसूण लागवड करून यशस्वीरित्या उत्पादन घेण्यासाठी शेतीचा प्रकार, मशागत, पाण्याचे डोस आणि निविष्ठा यांचे योग्य प्रकारचे नियोजन करावं लागतं असं विष्णू जरे सांगतात.








