संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार : आ. अमोल खताळ

0
86

संगमनेर, ता. १९ : शहरातील बसस्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर बसस्थानक परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा, अशी संगमनेरकरांची अनेक दिवसांपासून मागणी होती तो मागणी आता पूर्ण होणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने बसस्थानक परिसरात झालेल्या कार्यक्रमात आमदार खताळ यांनी ही घोषणा केली.

या कार्यक्रमास सर्व मराठा समाजाचे नेते राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल बागुल, नगरसेवक योगेश गांगुर्डे, सुग्रीव गांगुर्डे, गोपीचंद पडवळ, दिनेश घायाळ, विनोद गांगुर्डे, जितेंद्र जाधव, कल्पना बागुल, करुणा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, “संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार आहे. ही घोषणा माझ्या वतीने मी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान असून, त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा निर्धार आपण केला पाहिजे.”

त्यांनी सांगितले की, “या पुतळ्याच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. लवकरच या पुतळ्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here