शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धत अवलंबवा ; ना. विखे पाटील; महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन संपन्न

0
119

लोणी : पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने, पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सांगोला महाविद्यालयात आयोजित २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमत विविध जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे की, राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणे राज्याचे धोरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्याची कार्यवाही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुराचे अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये, म्हणून नदीजोड प्रकल्पांना चालना दिली जात आहे. राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याबर जोर देऊन पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आज वातावरणातील बदलाचा मोठा परीणाम सिंचन व्यव्सथेवर होतो. यासाठी सोलर पॅनलच्या वापरामुळे धरणांवर वीज निर्मिती होईल आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणात वाळू आणि गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे, याबाबत लवकरच उपाय योजना करण्यासाठी विभागाचे प्रयत्न असल्याचे विखे यांनी आश्वस्त केले. वेिळी भारतीय हवामान खात्याकडून स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सिंचन प्रकल्पांना गती देणार

जलसंपदाचे सचिव संजय बेलसरे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापनात आवश्यक बदल सुचवल्यास, त्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सोडविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here