सत्यजीत तांबे यांचा श्रेय लाटण्याचा प्रकार – जनतेची फसवणूक थांबवा!

0
107

संगमनेर – संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी आवश्यक असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागणीसाठी आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ठोस पाठपुरावा केला होता. संगमनेर मतदारसंघ हा मोठा भूभाग व्यापणारा असून, नागरिकांना श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठण्यासाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत होता. या समस्येच्या सोडवणुकीसाठी आमदार खताळ यांनी सक्रिय भूमिका बजावली.

आमदार खताळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संगमनेरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू आहे. मात्र, हा विषय सुरुवातीपासून हाताळणाऱ्या आमदार खताळ यांचा या निर्णयात मोठा वाटा असताना आमदार सत्यजीत तांबे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या ४० वर्षांपासून संगमनेरात सत्ता असूनही सत्यजीत तांबे आणि त्यांच्या पक्षाने हा प्रश्न कधीच गांभीर्याने घेतला नाही.असा प्रश्न आता संगमनेरमधील नागरिक विचारत आहेत.

आमदार खताळ यांनी प्रत्यक्ष जनतेच्या समस्यांसाठी लढा देऊन पुढाकार घेतल्यानंतरच तांबे हे त्या योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, संगमनेरच्या जनतेला सत्य काय आहे, हे पूर्णतः माहीत आहे अशी भावना काही लोकांनी यावेळी व्यक्त केली.

आज, मतदारसंघातील नागरिक सत्यजीत तांबे यांच्या राजकीय श्रेय लाटण्याच्या कृतीमुळे नाराज असून, आमदार खताळ यांची काम करण्याची शैली आणि विकासात्मक दृष्टिकोन हा संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.अशी चर्चा संगमनेरमधील नागरिकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here