महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार

0
81

विठ्ठलराव लंघे : कुकाण्यात बचत गटांना कर्ज वितरण

नेवासा : महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य असेल. महिलांना बचत गट चळवळीतून स्वयंम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.

कुकाणा (ता. नेवासा) येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (दि.८) नारी शक्तीचा सन्मान सोहळा, तसेच महिला आरोग्य शिबिर व महिला बचत गटांना महिला दिन कार्यक्रमात कर्ज वितरण करण्यात आले.

यावेळी रत्नमाला लंघे, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कुकाण्याच्या सरपंच लता अभंग, उपसरपंच शुभांगी कचरे, ग्रामपंचायत सदस्या हकीमाबी शेख, रोहिणी शिंदे, जयश्री लंघे, डॉ. विद्या कोलते, शोभा अलवणे, मंगल काळे, सुरेखा देशमुख, आशा खरे, भारती वालतुरे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष भारती बेद्रे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, डॉ. बाळासाहेब कोलते, मनोज पारखे, सोमनाथ कचरे, तेलकुडगावचे सरपंच सतीश काळे उपस्थित होते. ऐतिहासिक नगर जिल्ह्याचे नामकरण महायुती सरकारने अहिल्यादेवी केल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुकही यावेळी त्यांनी केले.

नेवासा तालुक्याचा सर्वागीण विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार असून, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याची भूमिका ठेवणार असल्याचेही यावेळी आमदार लंघे यांनी महिला दिन कार्यक्रमात यावेळी बोलताना केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला भगिनी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here