आमदार अमोल खताळ यांनी केले कडलग कुटुंबियाचे सांत्वन; 25 लाखाच्या शासन मदतीचे पत्र कुटुंबीयांकडे सुपूर्त

0
519

संगमनेर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संगमनेर येथे परतताच आमदार अमोल खताळ यांनी जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिद्धेश सुरज कडलग या सहा वर्षाच्या बालकाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले व कुटुंबीयांना धीर दिला. वनविभागा च्या वतीने देण्यात येणाऱ्या 25 लाख रुपये मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांना दिले

जवळे कडलग आणि परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आमदार खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या परिसरामध्ये जास्तीत जास्त पिंजरे लावावेत तसेच बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवावे, अशा स्पष्ट सूचना आ खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अहिल्यानगर येथील उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचे प्राप्त झालेले २५ लाख रुपये आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांना देण्यात आले. मंजूर रकमेपैकी तातडीची मदत म्हणून दहा लाख रुपये रक्कम आर टी जी एस द्वारे सुरज कडलग यांना देण्यात येणार आहे .तसेच दहा लाख रुपये रक्कम पाच वर्षाकरिता व उर्वरित पाच लाख रुपये रक्कम दहा वर्षा करिता कडलक यांच्या राष्ट्रीयकृत बँकखात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र कडलग यांना सुपूर्त करण्यात आले उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांनी दिले यावेळी साहाय्यक वन संरक्षक अमरजीत पवार वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह संतोष कडलग सुनील देशमुख, सचिन कडलग, अमोल देशमुख, किरण वामन, राहुल वामन, पवन हांडे, श्रीकांत कडलग, बापू देशमुख ,सतीश देशमुख, रोहिदास साबळे, संभाजी कडलग, कैलास आदभाई ,महेश सुर्वे, दत्ता कडलग, योगेश पवार,एकनाथ कडलग यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील सिद्धेश सुरज कडलग या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला कडलग परिवारातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्या बाबत आपले वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलणे झाले आहे त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तुमच्या कुटुंबातील कोणाचे नाव द्यायचे ते एक नाव मला कळवा त्यासाठी पाठपुरावा करेल – आमदार अमोल खताळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here