…तर पुणे नाशिक रेल्वे मार्गाला अडथळा नाही

0
99

रेल्वेमार्ग 491 चौरस किलोमीटर दूरवरून गेला, तरीही जीएमआरटीमधील संशोधन सुरू राहणार

पुणे: जीएमआरटी ही महाकाय दुर्बीण हाताळणाऱ्या आणि तिच्यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा नाशिक सेमी हायस्पीड या प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध नाही. हा रेल्वेमार्ग 491 चौरस किलोमीटर दूरवरून गेला, तरीही दुर्बणिीचे काम व्यवस्थित चालू शकते, असे मत शास्त्रज्ञांचे आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या दुर्बणिीची काही रहस्ये शास्त्रज्ञांनी सांगितली. त्यामुळे दुर्बीणही राहील अन् रेल्वेमार्गही होईल, असा पर्याय शास्त्रज्ञांनी सुचविला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावी सुमारे 400 एकर परिसरात जगातील सर्वांत मोठी अन् महत्त्वाची अशी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) ही महाकाय दुर्बीण 1987 ते 1989 या कालावधीत बसविण्यात आली. त्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले आत्मनिर्भर असेच काम ठरले आहे.

कारण, आज अशी दुर्बीण करायची म्हटले तर कोट्यवधी रुपये खर्च येतो. मात्र, त्या काळात म्हणजे सुमारे 35 वर्षांपूर्वी ती अवघ्या 50 लाख रुपयांत तयार करण्यात भारतीय शास्त्रज्ञांनी यश मिळविले. आज नासा ते इस्रो या खगोल संस्थेतील शास्त्रज्ञ अवकाशातील गुपिते जाणून घेण्यासाठी या दुर्बणिीचा उपयोग करतात. दर दोन ते तीन महिन्यांत भारतीय किंवा विदेशी शास्त्रज्ञ अवकाश संशोधनातील मोठी बातमी या दुर्बणिीच्या साह्याने जगाला देत असतात. आजवर शेकडो शोध याच दुर्बणिीच्या साह्याने लावले.

मात्र, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग याच्या जवळून जाणार असल्याने दुर्बणिीला धोका पोहचेल, अशी चर्चा सुरू झाली. ती चर्चा केंद्र शासनापर्यंत गेली. शेवटी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे शहरातील सी-डॅक संस्थेतील एका कार्यक्रमात सांगितले की, खोडदमधील महाकाय दुर्बणिीला काही होणार नाही आणि रेल्वेमार्ग देखील होईल, असा मधला मार्ग त्यांनी सुचविला. त्यामुळे यावरचे वाद-प्रतिवाद अंशतः थंडावले.

संपूर्ण विश्वाची हालचाल टिपणारी दुर्बीण

अवकाशविश्वाच्या पसाऱ्यात काय सुरू आहे, हे दुर्बीणच सांगू लागली. त्याचे ताजे फोटोही पाठवू लागली. लाखो प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या शेकडो नव्या आकाशगंगा, महाकाय कृष्णविवरे यांची माहिती देऊ लागली. त्यामुळे संपूर्ण विश्वाची हालचाल टिपणारे खोडद हे गाव जगाला समजले.

नेमकी कशी आहे ही दुर्बीण..?

खोडद गाव आणि परिसरात सुमारे तीस दुर्बणिींचा समूह आहे. त्यातील काही दुर्बणिींचा व्यास हा 45 मीटर इतका आहे. ब्रह्मांडातील रेडिओ लहरींचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेने स्थापना केली असून, नारायणगावपासून 10 कि. मी. पूर्वेला ती आहे. प्रत्यक्ष कामाची सुरुवात 1995 मध्ये झाली. 47 हजार चौ. मी. इतके क्षेत्र त्यामुळे संवेदनशील मानले आहे. यात 50 ते 1420 मेगाहर्टझ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो. येथे सध्या 50 ते 55 शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. संपूर्ण जगातील खगोलशास्त्रज्ञांचे हे तीर्थक्षेत्र आहे.

लाखो प्रकाशवर्षे दूरवरचे द़ृश्य अन् लहरी टिपते…

डॉ. सोळंकी म्हणाले, पृथ्वीचे वय आज 13.76 अब्ज वर्षे मानले जाते. त्या काळापासूनच्या लहरी ही दुर्बीण खेचून आपल्यापर्यंत आणते. ताऱ्यांची निर्मतिी, मृत्यू यांची नोंद ही दुर्बीण घेते. एक तारा एका सेकंदाला एक हजार वेळा फिरतो, त्याला मिली पल्सर म्हणतात. तो मृत होताना मोठे फ्लॅश देत चमकत असतो. ही दुर्बीण हे सर्वच टिपते. ब्रह्मांडातील सूक्ष्म लहरी, तेथून येणारे सिग्नल ही दुर्बीण शास्त्रज्ञांना देते.

– डॉ. जे. के. सोळंकी, शास्त्रज्ञ, जीएमआरटी, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here