दत्त देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू

0
47
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती

संगमनेर : अकलापूर हे दत्त महाराजांचे जागृत देवस्थान असून देवस्थानचा परिसर जरी अकोले मतदारसंघात असला तरी आपण आणि आमदार किरण लाहामटे दोघे मिळून या देवस्थान परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. प्रस्ताव तयार करून आमच्याकडे द्या आम्ही दोघेही आमदार मिळून पुढील दत्त जयंतीपर्यंत अकलापूर देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला.

तालुक्यातील अकलापूर येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी  दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की, हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या मंदिर परिसराच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी मिळणार आहे. तसेच आमदार लहामटे यांनी या मंदिर परिसराच्या विकासासाठी तीन कोटीचा निधी दिला आहे. या दत्त मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तयार करा. मी आणि आमदार लहामटे आम्ही दोघे पुढील दत्त जयंती उत्सवापर्यंत या मंदिराला ब वर्ग दर्जा मिळून देऊ असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दत्त देवस्थानला दिला आहे.

भविष्यात परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करून तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न – आ. अमोल खताळ 

अकलापूर देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतर तुम्हाला निधी मागण्यासाठी कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. पहिल्या टप्प्यात पाच कोटीचा निधी मिळेल प्रत्येकाला दत्त महाराजांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून आशीर्वाद मिळत असतो असाच आशीर्वाद मला ही मिळाला आहे. भविष्यात हा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित कसा होईल आणि या भागातील तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने मी आणि आमदार किरण लहामटे प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here