गणित-विज्ञान प्रदर्शनातूनच नवे संशोधक तयार होतील – आ. अमोल खताळ

0
29

गणित विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

संगमनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला गणित-विज्ञान प्रदर्शनातून चालना मिळत असते यासारख्या प्रदर्शनांमधून माजी राष्ट्रपती आणि संशोधक डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांसारखे संशोधक नक्कीच तयार होतील, असा ठाम विश्वास आहे. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर पंचायत समिती व संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या गणित-विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय जोंधळे होते .या .कार्यक्रमास पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हरिभाऊ दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे, प्रवेशक बी सी दिघे, सिद्धार्थ विद्यालय प्राचार्य रघुनाथ जगताप, शिवसेना वैद्यकीय सेलचे जिल्हाप्रमुख डॉ संतोष डांगे, तसेच स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले, आमदार झाल्यानंतर हे माझे दुसरे गणित-विज्ञान प्रदर्शन आहे. पहिले प्रदर्शन शहरातील सिद्धार्थ विद्यालयात भरले होते. त्या वेळीही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने भारावून गेलो होतो. आज तळेगाव दिघे येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग तितकेच उत्कृष्ट असून त्यांची जिद्द आणि अभ्यासू वृत्ती कौतुकास्पद आहे. शहरी भागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन सहज मिळते; मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी पालक कमी प्रमाणात उपस्थित राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रदूषण देशाची सुरक्षितता पाऊस पाणी शेती औद्योगीकरण सौर ऊर्जा यासारखे विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले.या विद्यार्थ्यांमधूनच उद्या एखादा ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’ घडेल असा आशावाद आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचार करून शैक्षणिक सुविधांबाबत ठोस निर्णय घ्यावेत – दत्तात्रय जोंधळे(कार्याध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण संस्था)

ग्रामीण भागातील मुले अत्यंत कल्पक आणि मेहनती आहेत. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे शहरांमध्ये कौतुक केले जाते. मात्र ज्या सुविधा शहरी भागात उपलब्ध आहेत त्या ग्रामीण भागात नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचार करून शैक्षणिक सुविधांबाबत ठोस निर्णय घ्यावेत. ही बाब आपण विधिमंडळात मांडावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here