अनंत फंदी नाट्यगृहाच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे संगमनेरातून बाजार उठल्यानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या थोरात तांबे पार्टीचा विधवा विलाप – दिनेश फटांगरे

0
92

संगमनेर : तालुक्याला सांस्कृतिक आणि लोककलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. तालुक्याच्या संस्कृतीला गती देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरचे नाव देश विदेशात पोहचविणा-या तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने उपेक्षित लोककलावंतांना पुरस्कार देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम या वर्षापासुन सुरू केला आहे. त्यानिमीत्ताने मराठी भाषा व उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत व ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर शहरात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कवि अनंत फंदींच्या बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाची पहाणी मंत्रीमहोदय करणार आहेत त्यामुळेच संगमनेरात मामा भाचे पार्टीचा पोटशुळ उठला आहे.

गेल्या चाळीस वर्षांची थोरात तांबे कुटुंबाची संगमनेर तालुक्यातील जुलमी सत्ता उलथवून लावीत जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने संगमनेरात इतिहास घडवला व संगमनेर तालुक्यात ऐतिहासिक परिवर्तन घडवलं. संगमनेर तालुक्यातील जनतेने ठोकरल्याच्या वैफल्यानुत अजूनही बाहेर येण्याची मनःस्थिती नसलेल्या थोरात तांबे यांनी कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतांना पदवीधर आमदाराच्या माध्यमातून उठसूठ महायुतीच्या कोणत्याही सन्माननिय मंत्रीमहोदय यांचेसोबतचे फोटो टाकणे जनसेवक आमदार अमोलभाऊंनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची धडपड करणे असे केविलवाणे प्रकार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वारंवार सिद्ध होऊन देखील यांच्यात कोणतीही सुधारणा होतांना दिसत नाही.

त्याचाच प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा गलिच्छ राजकारण करीत खोट्यानाट्या बातम्या पसरविण्याचा उपद्व्याप केल्याची पक्की खात्रीच आज त्यांनी आज संगमनेरकर जनतेला करून दिली आहे असे आता संगमनेरचे नागरिक उघड उघड बोलत आहेत. आमदार अमोलभाऊ खताळांसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील संघर्षशील व चळवळीतील कार्यकर्ता प्रस्थापितांसमोर आव्हान उभे करतो, विजयाची वाट धरतो हे पाहून वैफल्यग्रस्त झालेल्या मामा भाचे पार्टीचा हा दुटप्पीपणा आता इतका सर्रास झाला आहे की लोकांनाही त्याचं आश्चर्य वाटेनासं झाल आहे.

प्रामाणिकपणाच्या बळावर जनतेच्या ह्रदयात स्थान मिळवणारे, लोककल्याणाच्या विचाराने झपाटलेले, आणि संगमनेर तालुक्याच भविष्य उजळविण्याचा ध्यास घेतलेलेले जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ यांच्यावर  कितीही आरोप केले कितीही अपप्रचार केला, तरी जनता कोणासाठी ह्रदयात स्थान राखते हे संपूर्ण महाराष्ट्राला संगमनेर तालुक्यातील जनतेनेच दाखवून दिले आहे आमदार अमोलभाऊंनी केवळ पदाची शोभा वाढवली नाही, तर जनतेच्या मनात एक वर्षाच्या कालावधीत विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे.

त्यांच्या नेतृत्वात संगमनेरकरांनी ऐतिहासिक निर्णय अनुभवले, विकासाचे नवे मापदंड गाठले आणि प्रशासनात पारदर्शकतेची नवी दिशा मिळवली आहे  संगमनेर तालुका विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या थोरात तांबे पार्टीचा येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीत वेळ आल्यावर लोक बरोबर हिशोब करतील हे मामा भाचे पार्टीने लक्षात असू द्यावे यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत हे संगमनेरकरांना आता कळून चुकले आहे.

चाळीस वर्ष सत्ता फक्त कुटुंबातील लोकांसाठीच उपभोगून संगमनेर तालुक्याचा भरभरून विकास केला कायापालट केला अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पाडला पण वास्तवात काहीच नाही अशीच संगमनेर तालुक्याची आवस्था होती.

सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आमदार अमोलभाऊंसारखा सारखा व्हिजनरी आमदार संगमनेर तालुक्याला लाभला आहे पण मामा भाचे पार्टी संगमनेरात फेक नॅरेटिव्ह पसरवून नागरीकांची दिशाभूल करीत आहेत

शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मेहनतीवर संगमनेरची अर्थव्यवस्था उभी आहे पण मामा भाचे पार्टी शेतकऱ्यांच्या संस्थांच्या पैशातून शेतकऱ्यांच्या टाळुवरच लोणी खाऊन स्वतःची व कुटुंबाची प्रसिद्धी करण्यात मश्गूल आहेत हे संगमनेरकर न समजण्या इतपत दुधखुळे नाहीत.

आमदार अमोलभाऊंच्या माध्यमातून वर्षभरात झालेल्या विकासकामांमुळे संगमनेर तालुक्यातील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे आणि तालुक्याच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात आहे असा विश्वास संगमनेरकरांना आहे संगमनेरकरांच्या कल्याणासाठी, त्यांच्या श्रमांचा सन्मान राखण्यासाठी आणि शहर व ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी आमदार अमोलभाऊ रात्रंदिवस काम करीत आहेत  वीज, रस्ते, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा प्रत्येक गावात पोहोचवणं हेच आमदार अमोलभाऊंच ध्येय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here