अनंत फंदी नाट्यगृहाच्या कामास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; मंत्री सामंताकडे आ.खताळ करणार मागणी!

0
269

संगमनेर : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे केंद्र असलेल्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाच्या कामाला झालेल्या विलंबाची मागणी आपण मंत्री उदय सामंत यांच्याकडे आपण करणार असून,यासाठीच त्यांना नाट्यगृहाच्या कामाची पाहाणी करण्याची विनंती केली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलतांना आ.अमोल खताळ म्हणाले की, संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीचा मुख्य आधार असलेल्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. त्यामुळेच शहर आणि तालुक्यातील साहीत्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांना याचा कोणताही लाभ घेता येत नाही.

गेली अनेक वर्षे निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगितले जाते मग काम का पूर्ण होत नाही. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आपण मागणी केली होती.

जेष्ठ तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यास मंत्री उदय सामंत येत असून त्यांनी नाट्यगृहाच्या कामाची पाहाणी करून याची चौकशी करावी ही विनंती मान्य करून मंत्री सामंत रविवारी दुपारी भेट देणार आहेत.

मंत्री उदय सामंत हे अखिल मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. नाटयगृहाच्या कामासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळावे तसेच यापुर्वी नाटयगृहाच्या कामासाठी मागणी केल्याप्रमाणे निधीची उपलब्धता करून द्यावी आशी विनंती आपण करणार असल्याचे आ.अमोल खताळ म्हणाले.

यापुर्वी अनेक वर्ष आश्वासन मिळाले फक्त स्वप्न दाखवली गेली. आता महायुती सरकार काम करून निधी उपलब्ध करून देत असल्याने अनेकांना जेलसी झाली आहे. त्यामुळेच कोणत्याही कामाचे निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नाचता येईना अंगण वाकडे आशीच परीस्थीती काहीची झाली असल्याचा टोला आ.खताळ यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here