संगमनेरात खुलेआम अवैध दारू विक्री; एलसीबीची वेदांत वाईन शॉपसह चौघांवर कारवाई

0
30

संगमनेर : शहर व परिसरात वाढत्या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने बुधवारी (दि. १) कारवाई करत एकाच दिवशी मोठी मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

धडक कारवाईत पोलिसांनी ३,८१,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वेदांत वाईन्सच्या चालक मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुलेवाडी रोडवर अवैध दारू विक्री करताना संतोष अर्जुन खरात याला ताब्यात घेण्यात आले. तसेच वाहतुक करणारे रामनाथ चांगदेव शिरसाठ व उमेश आनंद सदा हे दोघे रंगेहाथ पकडले गेले.

दारु विकत घेणाऱ्याचा परवाना तपासून त्यास ठरलेल्या कोठ्याप्रमाणे दारु विकण्याचा नियम आहे. तरी देखील वेदांत वाईन शॉपमध्ये सर्रासपणे कोणालाही खोकेच्या खोके दारु विकली जात आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश दिसून येत आहे. या कृतीमुळे नगर एलसीबीने कारवाई करताना त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दररोज दारु विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here