साकूर येथे सेवा पंधरवडा अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
31

संगमनेर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अभियान सुरु करण्यात आला आहे. यानिमित्ताने संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या सुचनेनुसार बुधवार दि.24 सप्टेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील साकूर मंडलाधिकारी कार्यालय येथे मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी शिबीरात येणार्‍या नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शेतकर्‍यांच्या मागणीवरुन महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ते योजने अंतर्गत थेट जागेवर जाऊन देखील काही रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या शिबीरामध्ये उत्पन्नाचा दाखला, नाॅन क्रिमिलेयर, अधिवास दाखला, जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना ई.योजनांसाठी तसेच फेरफार नोंद, वारस नोंदींसाठी अर्ज स्विकारण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, ज्येष्ठ नेते बुवाजी खेमनर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here